Thursday, May 14, 2026
HomeनगरRahuri : राहुरी पोटनिवडणूक अर्ज छाननी; 30 पैकी 7 उमेदवारी अर्ज ठरले...

Rahuri : राहुरी पोटनिवडणूक अर्ज छाननी; 30 पैकी 7 उमेदवारी अर्ज ठरले अवैध

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी दि. 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 30 उमेदवारांनी 42 अर्ज दाखल केले. त्यापैकी काल झालेल्या छाननीत 7 उमेदवारांचे अर्ज अवैध तसेच 23 अर्ज वैध असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिली.

- Advertisement -

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 69 व्यक्तींनी 146 अर्ज नेले. त्यापैकी 30 उमेदवारांनी 42 अर्ज दाखल केले होते. मात्र काल दि. 7 एप्रिल रोजी झालेल्या छाननीत उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष), दत्तात्रय लक्ष्मण म्हैस (अपक्ष), त्रिशला मिलिंद कांबळे (अपक्ष), शिवाजी आनंदा कदम (अपक्ष), नंदकुमार भागवत खेमनर (अपक्ष), सोहम बापूसाहेब चिंधे (लोपा, अपक्ष), शोएब सुभेदार शेख (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज आवश्यक प्रस्तावकाच्या सह्या, अनामत रक्कम नसणे, नामनिर्देशन पत्र परिपुर्ण नसणे आदी कारणांवरून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अवैध ठरविले.

तर अक्षय शिवाजीराव कर्डिले (भाजपा), गोविंद खंडू मोकाटे (शरद पवार गट), रावसाहेब सदाराम खेवरे (अपक्ष), संतोष एकनाथ चोळके (वंचीत), साहेबराव पाटिलबा म्हसे (अपक्ष), अथर्व साहेबराव म्हसे (अपक्ष), सविता रामचंद्र शेटे (अपक्ष), अल्ताफ इब्राहिम शेख (अपक्ष), बिलाल गफुरभाई शेख (अपक्ष), सुरेश दत्तात्रय लांबे (अपक्ष), संभाजी लक्ष्मण धोंडे (अपक्ष), नागेश विलास जाधव (अपक्ष), रविंद्र बापूसाहेब मोरे (अपक्ष), इम्रान नबी देशमुख (अपक्ष), बाळासाहेब सोमा जाधव (अपक्ष), सखाहरी शांताराम बर्डे (अपक्ष), नामदेव बंडू पवार (अपक्ष), अनिल भिकाजी जाधव (अपक्ष), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (अपक्ष), बाळू बापूराव कोळसे (अपक्ष), महेश केशव हापसे (अपक्ष), प्रतिमा किशोर देसर्डा (अपक्ष) अशा 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले. यामुळे राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार आहे.

ताज्या बातम्या

Kerala CM : केरळमच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला; काँग्रेसकडून ‘या’ नेत्याच्या नावावर...

0
नवी दिल्ली | New Delhi नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections) भाजपला पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीत यश मिळाले होते. तसेच...