Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar : राहुरीची आज प्रारूप मतदार यादी

Ahilyanagar : राहुरीची आज प्रारूप मतदार यादी

वर्षभरात 10 हजार मतदारांसह 67 मतदान केंद्रही वाढणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्वतयारी निवडणूक आयोगाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या मतदारसंघात वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत 3 लाख 21 हजार मतदार होते. त्यानंतर सध्या मतदारसंघात 3 लाख 31 हजार मतदार झाले असून वर्षभरात या ठिकाणी 10 हजार मतदार वाढले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्राच्या सुधारित सुचनानूसार मतदारसंघात 67 मतदान केंद्रही वाढणार असून मतदारांची प्रारूप मतदार यादी आज प्रसिध्द होणार आहे.

- Advertisement -

विधानसभेच्या राहुरी मतदारसंघासाठी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्यावर हरकती सूचना घेण्यात येऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीवर हरकती व सूचना घेण्यासाठी 24 जानेवारीपर्यंत मुदत असून येणार्‍या हरकती निकाली काढण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत मुदत राहणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात अथवा मार्च महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील कलम 21 नुसार या मतदारसंघासाठी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

YouTube video player

हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या आहार दिनांकावर राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार मतदारसंघातील मतदान केंद्रांची सुसूत्रीकरण 29 डिसेंबरपर्यंत करण्याची निर्देश देण्यात आले होते. या मतदारसंघात 3 हजार 7 मतदार केंद्रांची संख्या होती. निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनानुसार कोणत्याही मतदारसंघात एक हजार 200 पेक्षा अधिक मतदार संख्या नसावी, यासाठी मतदान केंद्राची सुसूत्रीकरण करण्यात येत असून आले असून यामुळे मतदारसंघात 67 मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे. या मतदारसंघात एकूण 374 मतदान केंद्र राहणार आहेत.

पश्चिम बंगालसोबत राहुरी
पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसोबत नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. साधारण ही निवडणूक मार्च महिन्यांत होणार असल्याचा कयास आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने तयारी सुरू केलेली आहे.

ताज्या बातम्या

Ravindra Chavan : विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र...

0
लातूर । Latur लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर चढू लागला असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने जिल्ह्याच्या...