Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यात करोनाचा पुन्हा उद्रेक; 25 जणांना बाधा

राहुरी तालुक्यात करोनाचा पुन्हा उद्रेक; 25 जणांना बाधा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात काल गुरूवारी दिवसभरात पुन्हा करोनाचा उद्रेक झाला. तालुक्यातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली

- Advertisement -

असून आरोग्य व महसूल प्रशासन मात्र, अद्यापही त्याकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तालुक्यात राहुरी शहरासह ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला आहे. जिल्हाधिकार्‍यांचे आदेश पायदळी तुडवून महसूल प्रशासन मात्र, उदासिनता दाखवित असून तालुक्यात करोना महामारीवर नियंत्रण आणण्यास आरोग्य व महसूल प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

काल दिवसभरात राहुरी शहरात सहाजणांना करोनाची बाधा झाली. त्यात 4 पुरुष असून ते 65, 54, 33, 67 व 2 महिला 65, 36 वर्ष वयोगटातील आहेत. राहुरी शहरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

केंदळ बु. येथे पाचजणांना करोना महामारीने ग्रासले असून त्यात 3 पुरुष 16, 45, 80 वर्ष व 2 महिला 50, 50 वर्ष अशा वयोगटातील आहेत. वांबोरीतही करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. त्यात तीनजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात 2 पुरुष 30, 30 वर्ष व 1 महिला 50 वर्ष अशा वयोगटातील आहे.

सडे दोन 36, 53 वर्ष वयोगटातील महिलांना करोनाची बाधा झाली आहे. मल्हारवाडी येथे 62 वर्ष पुरुष, 43 वर्ष महिला अशा दोनजणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. तांदुळवाडी 52 वर्ष महिला करोनाग्रस्त झाली. तर शिलेगांव 70 वर्षाच्या पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दवणगांव 65 वर्ष महिला, गणेगांव 31 वर्ष पुरुष, खडांबे खुर्द 36 वर्ष पुरुष, राहुरी फॅक्टरी 36 वर्षाच्या पुरुषाला तर बारागांव नांदुर येथे 33 वर्षीय पुरुषाला करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या आठवडाभरात करोनाग्रस्तांनी शंभरी ओलांडल्याने नागरिक चिंतातूर झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या