Thursday, March 13, 2025
Homeनगरराहुरी शहरातील अतिक्रमणांवर उद्या पालिकेचा ‘बुलडोझर’

राहुरी शहरातील अतिक्रमणांवर उद्या पालिकेचा ‘बुलडोझर’

पोलीस बंदोबस्तात होणार धडक कारवाई

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

अहिल्यानगर जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार जिल्हा अधिकारी यांनी सर्वच विभागाला लेखी आदेश देवून अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिले आहेत. राहुरी शहरातील अतिक्रमणांवर उद्या शुक्रवार दि. 14 फेब्रुवारीपासून चोख पोलीस बंदोबस्तात बुलडोझर फिरणार असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्याचे मोजमाप झाले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनालाही बंदोबस्तासाठी पत्र दिल्याची माहिती राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

राहुरी शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईची अनेकांनी धास्ती घेतली आहे. राहुरी शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्याला अडथळा निर्माण करणार्‍यांवर शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी पासून चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठेत असलेले काही गाळे भूईसपाट करण्यात येणार आहेत तर शहरातील मुख्य जुनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात काही व्यापार्‍यांनी अतिक्रमण केले आहे. यामध्ये नगरपालिकेपासून तर शिवाजी चौक हा रस्ता 9 मिटर असून रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍यांच्या अतिक्रमणावर हातोडा पडणार आहे.

तर शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल 12 मीटर रस्ता आहे. ग्रामीण रुग्णालय ते भागीरथीबाई शाळा रोड ते रोटरी ब्लड बँक पर्यंत 20 मिटर रस्ता असून यामध्ये ज्या कोणी अतिक्रमण केले आहे, त्यांची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. तर शुक्लेश्वर चौक ते प्रगती शाळा रोड ते पृथ्वी कॉर्नर हा 12 मीटर असा रस्ता आहे. मल्हारवाडी चौक, नविपेठ ते शनी चौक 15 मिटर असा रस्त्याची नोंद पालिकेत असून याची मोजणी झालेली आहे. तसेच महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने नगर-मनमाड महामार्गाचेही मोजमाप केले असून त्यांनीही पोलीस प्रशासनाला बंदोबस्तासाठी पत्र दिले असल्याचे समजते. मात्र, त्यांची कारवाईची निश्चित तारीख व वेळ समजू शकली नाही.

दोन दिवसांचा अल्टीमेटम
दोन दिवसांत शहरातील बाजारपेठेत व रहदारीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण करणार्‍यांनी तात्काळ स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे. अन्यथा, शुक्रवारी सर्वच अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली.

सदर अतिक्रमण हटाव कारवाईचे राहुरीकरांनी स्वागत केले आहे. मात्र, प्रशासनाने कोणतीही धनदांडगेशाही व राजकीय हस्तक्षेप अथवा कोणाचाही मुलहिजा न ठेवता ही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...