Friday, May 3, 2024
Homeनगरचंदन तस्करी करणार्‍या दोघांना राहुरी पोलिसांनी केले जेरबंद

चंदन तस्करी करणार्‍या दोघांना राहुरी पोलिसांनी केले जेरबंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) येथे चंदनाची तस्करी (Smuggling of sandalwood) करणाऱ्या दोघां जणांना राहुरी पोलिस (Rahuri Police) पथकाने सहा किलो चंदन (Sandalwood) व मोटारसायकल असा सुमारे १ लाख ९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद (Arrested) केले. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी (Vambori) परिसरात दिनांक ६ सप्टेंबर रोजी घडली आहे.

- Advertisement -

दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान या घटनेतील चंदन चोर (Sandalwood) अमर पवार व विजय पवार हे राहुरी (Rahuri) तालुक्यातील वांबोरी (Vambori) परिसरात प्रसाद साखर कारखान्यापासून (Prasad Sugar Factories0 कात्रडकडे (Katrad) जाणार आहेत. अशी खबर राहुरी पोलिस ठाण्यातील (Rahuri Police Station) पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त खबऱ्या कडून मिळाली. त्यांनी ताबडतोब सदर घटनेची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार दिनकर चव्हाण, संतोषकुमार राठोड, पोलिस नाईक आजिनाथ पालवे, रोहित पालवे आदि पोलिस पथकाने कात्रडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला.

काही वेळातच आरोपी अमर पवार व विजय पवार हे दोघे एका मोटरसायकलवर आले. पोलिस पथकाने ताबडतोब त्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे सहा किलो वजनाची चंदनाचे लाकडे (Sandalwood) आढळून आली. ते चंदन आरोपी बाबासाहेब शिंदे याला विक्री करण्यासाठी चालवली होती. अशी त्यांनी माहिती दिली.

या कारवाईत पोलिस पथकाने ६ किलो २०० ग्रँम वजनाचे ५८ हजार ९०० रूपये किंमतीचे चंदन तसेच एक ५० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख ८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी अमर नामदेव पवार वय ३० वर्षे राहणार आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी, विजय रामदास पवार वय ३८ वर्षे राहणार एकलव्य वसाहत, राहुरी या दोघांना गजाआड केले.

तसेच बाबासाहेब शिंदे राहणार काञड ता. राहुरी. हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटने बाबत पोलिस नाईक रोहित पालवे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत तिघांवर चंदन तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या