Saturday, May 2, 2026
Homeक्राईमराहुरी पोलीसांच्या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत 10 आरोपींना अटक

राहुरी पोलीसांच्या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत 10 आरोपींना अटक

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलीस ठाण्याने (Rahuri Police Station) 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून 2 ऑगस्ट मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ऑपरेशन ऑल आउट (Operation All Out) राबवले असून या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 107 समन्स, 32 जामिनपात्र व 24 अजामिनपात्र वॉरंट बजावले असून 10 आरोपींना अजामिनपात्र वॉरंटच्या (Non-Bailable Warrant) आधारे अटक केली आहे.

- Advertisement -

या ऑपरेशन मध्ये मनोज नरहरी उदावंत, वय 57, रा. शिवाजी चौक, राहुरी, सुनिल चांगदेव शेलार (वय 25, रा. म्हैसगाव), सोपान रावसाहेब करमड (रा. घोरपडवाडी), सचिन उर्फ किरण दत्तु शेलार (रा. सोनवने वस्ती, टाकळीमियॉ, ता. राहुरी), आनंद लखीचंद देसरडा (रा. देवळाली प्रवरा), राहुल कैलास जवरे (रा. वांबोरी), तुषार रावसाहेब माने (रा. धामोरी), नितीन साहेबराव जंगले (रा. चेडगाव), बाबासाहेब चंद्रकांत तमनर (रा. तमनर आखाडा), किशोर भाऊसाहेब वाघुर (रा. मुलनमाथा) या सर्व आरोपींना अटक (Arrested) करून राहुरी न्यायालयात हजर केले.

ऑपरेशन दरम्यान, चंद्रकला राजू शिंदे (रा. डिग्रस), नवनाथ नारायण पिंपळे (रा. सात्रळ) आणि दीपक बाळासाहेब पवार (रा. वांजुळपोई) यांना गावठी हातभट्टीची दारू (Alcohol) विनापरवाना विकताना पकडले. त्यांच्या कडून 20 हजार रुपयांची 200 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त (Seized) करण्यात आली. याशिवाय विजय उगले (रा. यवतमाळ) हा संशयित मोटरसायकलवर राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत फिरताना आढळला. त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम 124 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सदर ऑपरेशन जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस पथकाने कार्यवाही केली. दरम्यान, ज्यांचे न्यायालयात खटले चालू आहेत, त्यांनी समन्स मिळताच न्यायालयात उपस्थित राहावे. अन्यथा, समन्सवर उपस्थित न राहिल्यास जामिनपात्र वॉरंट निघू शकते, आणि त्या वॉरंटच्या तारखेला उपस्थित न राहिल्यास अजामिनपात्र वॉरंट निघून अटकेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. वॉरंट निघाल्यास आरोपींनी ताबडतोब न्यायालयात हजर राहावे, असे आवाहन राहुरी पोलीस ठाण्याच्यावतीने (Rahuri Police Station) करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Pune Bhor Crime News : नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार; CM फडणवीसांची पहिली...

0
मुंबई | Mumbai पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर तालुक्याच्या (Bhor Taluka) नरसापूर परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Rape) करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder)...