Tuesday, May 27, 2025
Homeनगरराहुरी तालुक्यातून दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता

राहुरी तालुक्यातून दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी तालुक्यातून अल्पवयीन असलेल्या दोन सख्या अल्पवयीन बहिणींचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना 13 जुलै रोजी घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी महिला राहुरी तालुक्यातील असून तिला एक 16 वर्षे 11 महिने व दुसरी एक 15 वर्षीय अशा दोन मुली आहेत. त्या शिक्षण घेत आहेत. दि. 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजेचे सुमारास सदर दोन मुली व त्यांची आई घरात असताना मुली घराबाहेर बसल्या होत्या. काही वेळाने त्यांची आई घराबाहेर आली असता सदर दोन्ही मुली बेपत्ता झाल्या होत्या. मुलींच्या आईने आपल्या मुलींचा परिसरात शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. सदर मुलींच्या आईची खात्री झाली की, त्यांच्या दोन मुली घरात झालेल्या वादामुळे घरातून निघुन गेल्या आहेत. किंवा त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता पळवून नेले आहे.

त्यानंतर सदर मुलींच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमा विरोधात भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रिकामटेक्यांकडून राजकारण; वैद्यकीय महाविद्यालयावरून पालकमंत्र्यांची टीका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय...