Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedमाहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर छापा

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर छापा

पुणे |प्रतिनिधी|Pune

माहिती अधिकारी म्हणून मिरवणारा मात्र, त्याच्या नावाखाली जमीन खरेदीमध्ये फसवणूक करणे,

- Advertisement -

बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करून खंडणी गोळा करणे, बेकायदा सावकारी करणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला परंतु फरार असलेला रवींद्र बऱ्हाटेच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी सहा ठिकाणहून काही कागदपत्रे आणि बनावट शिक्के जप्त केले असून बुधवारी संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरु होती.

बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल आहेत़. हडपसर येथील गुन्ह्यामध्ये रवींद्र बऱ्हाटे हा टोळीप्रमुख असून तो संपूर्ण टोळी चालवत असल्याने त्यांच्यासह १३ जणांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

रवींद्र कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणीसह वेगवेगळ्या कलमाखाली जुलैमध्ये रवींद्र बऱ्हाटेसह चौघांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तेव्हापासून रवींद्र बऱ्हाटे हा पसार झाला आहे़ त्याच्या शोधासाठी शहर पोलीस दलाची पथके विविध शहरात शोध घेऊन आली़ परंतु, तो कोठेही मिळाला नाही़.

बऱ्हाटे याचे शनिवार पेठेतील कार्यालय, बिबवेवाडी -कोंढवा रस्त्यावरील लुल्लानगर तसेच धनकवडीतील तळजाई पठार परिसरात घर आहे़ याचबरोबर काही नातेवाईकांच्या घरावर पहाटेपासून कारवाई सुरु केली आहे़ या घरांची झडती सुरु आहे. बऱ्हाटे याने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे़.

- Advertisment -

ताज्या बातम्या