श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मधून जाणार्या रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
गुरूवारी रात्री पुणे जम्मू-तावी एक्सप्रेसखाली रेल्वे लाईन क्रॉस करीत असताना हा तरुण सापडून त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. संबंधित तरुण हा अंदाजे 20 वर्ष वयाचा आहे. त्याची उंची 5 फूट असून बांधा सडपातळ आहे.
चेहरा लांबट, केस वाढलेले असून त्याचा रंग गोरा आहे. उजव्या हाताच्या पंजावर क्रॉस व बदामाचे चिन्ह गोंदवलेले आहे. अंगात फूल बाह्याचा पांढरा टी शर्ट व जीन्स पॅन्ट पायात सँडल असून कपड्यावरून हा चांगल्या घरातील तरूण असल्याची माहिती पोलिसांकडून समजली. दरम्यान, सदर अनोळखी व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन वाय. ए. पठाण यांनी केले आहे.