Thursday, May 2, 2024
Homeजळगावरेल्वेने भंगार विक्रीतून मिळविले २२५ कोटी

रेल्वेने भंगार विक्रीतून मिळविले २२५ कोटी

भुसावळ – प्रतिनिधी Bhusawal

मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने, मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभाग, कार्यशाळा, शेड इत्यादी परिसर भंगार सामग्रीपासून मुक्त व्हावे यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू केले. चालू वर्षात म्हणजेच एप्रिल -२० ते जानेवारी–२१ दरम्यान मध्य रेल्वेने रु. २२४.९६ कोटी भंगाराची विक्री केली. या भंगार सामग्रीमध्ये निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य, मोडीत काढलेले डबे,वाघिणी आणि इंजिने इत्यादींचा समावेश आहे.

- Advertisement -

झिरो स्क्रॅप मिशन मोहिमेमुळे केवळ भारतीय रेल्वेसाठी कमाई होत नाही तर त्याचा परिणाम अतिरिक्त जागेची उपलब्धता देखील होते. वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने ५६०५७.१५ मे.टन वजनाच्या निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य आदि भंगार साहित्याच्या विक्रीतून रुपये ३२१.४६ कोटी महसूल जमा केला होता.

कोविड -१९ साथीच्या दरम्यान देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या व पार्सल गाड्यांच्या इंजिनांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे सुटे भाग व इतर लागणाऱ्या वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यात सामग्री व्यवस्थापन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.पीपीई किट्स , एन-९५ मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स इत्यादी वस्तू कर्मचार्‍यांना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, त्यासाठी अल्प कालावधीत निविदा काढून खरेदी करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या