Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशरेल्वे कर्मचार्‍यांना आता दोन शिफ्ट्समध्ये काम

रेल्वे कर्मचार्‍यांना आता दोन शिफ्ट्समध्ये काम

नवी दिल्ली / New Delhi – रेल्वे कर्मचार्‍यांच्या कामाच्योा वेळा बदलल्या आहेत. दोन शिफ्टमध्ये रेल्वे कर्मचारी काम करतील असा आदेश नवे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव (Railways Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिला आहे.

पहिली शिफ्ट सकाळी 7 ते 4 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 12 असेल. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी, पीआर, डी. जे. नारायण यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या माहिती व तंत्रज्ञानमंत्री खात्याची जबाबदारी देखील अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रविशंकर प्रसाद यांच्याप्रमाणे त्यांनाही ट्विटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशात व्यवसाय करणार्‍या प्रत्येकाला येथील कायद्याचे व नियमांचे पालन करावे लागेल, असे नवनियुक्त माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी गुरुवारी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्पष्ट केले.

माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील नवे नियम देशात कार्यरत असणार्‍या समाजमाध्यम कंपन्यांसाठी 26 मेपासून लागू करण्यात आले असून ट्विटरवगळता अन्य कंपन्या या नियमांचे पालन करत आहेत. प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला ग्राहक तक्रार निवारण अधिकार्‍याची नियुक्ती करणे बंधनकारक आहे.

पण, या अधिकार्‍याची नेमणूक ट्विटरने अजूनही केलेली नाही. या मुद्द्यावरून तत्कालिन केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ट्विटर विरोधात आघाडी उघडली होती. देशातील नियमांचे पालन ट्विटरला करावेच लागेल, असा इशारा प्रसाद यांनी दिला होता. नवे माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनीही प्रसाद यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या