Friday, May 3, 2024
Homeनगरपाचेगाव : परतीच्या पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

पाचेगाव : परतीच्या पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

पाचेगाव | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात परतीच्या पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हजेरी लावली. यात काही शेतकऱ्यांचा सोयाबीन व काढणीला आलेल्या कापूस अक्षरशः भिजवून गेला.

- Advertisement -

या भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घटल्याने शेतकऱ्यांची खरिपातील पिकांची नासाडी होत असून शेतकरी हैराण झाले आहे. खरीप हंगामातील पिकांचा तोंडाशी आलेला घास हा परतीचा पाऊस हिराहून घेतो की? अशी धास्ती या भागातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

तालुकयातील बहुतेक गावात महसूल व कृषी खात्याकडून नुकसान पंचनामे सुरू करण्यात आले, पण पाचेगावमाडे अजून पंचनामे का सुरू झाले नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या