Monday, May 6, 2024
Homeनगरपाऊस अन् विसर्गही थांबला

पाऊस अन् विसर्गही थांबला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पावसाने उघडीप दिली आणि नवीन पाण्याची आवक थांबली. धरणांचे दरवाजे बंद झाले. या हंगामात जायकवाडीच्या दिशेने 16.4 टिएमसीचा विसर्ग करुन गोदावरी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

यंदा पावसाने पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभक्षेत्रातही समाधानकारक स्थिती निर्माण केली नाही. धरणेे भरली असली तरी त्यातून विसर्ग कमी झाला. परिणामी जायकवाडीच्या समन्यायीचा बडगा नगर, नाशिकच्या धरणांवर आ वासून बघत आहे. 15 ऑक्टोबर नंतर त्यावर खल होईल. तुर्तास नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीला 1 लाख 90 हजार 498 क्युसेक म्हणजेच 16465 दलघफू म्हणजेच 16.4 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गतवर्षी या बंधार्‍यातून जायकवाडीकडे 125 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता.

नाशिकचे जवळपास सर्वच धरणं तुडूंब भरली आहेत. दारणा, भाम, भावली, वालदेवी, गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, कडवा, आळंदी ही सर्व धरणं तसेच नांदूर मधमश्ेवर बंधारा 100 टक्के भरले आहेत. मुकणे 95.30 टक्के, वाकी 89.93 टक्के, भोजापूर 99.17 टक्के असे भरलेले आहेत. दारणातून खाली 10 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. या धरणात गंगापूर मधून 1.5 टिएमसी, कडवातुन 1.4 टिएमसी, भोजापूर मधुन 284 दलघफू, आळंदीतून 155 दलघफू, वालदेवीतून 399 दलघफू असा विसर्ग करण्यात आला आहे.

मुख्य धरणांचे फिडर डॅम म्हणून ओळखले जाणार्‍या भाम मधून 3.7 टिएमसी, भावलीतून 942 दलघफू, कश्यपीतून 44 दलघफू असा विसर्ग झाला आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाचा थेंबही पडत नाही. नाशिकमधील सर्व धरणांचा उपयुक्तसाठा काल 97.18 टक्के इतका आहे. कालच्या तारखेला मागील वर्षी तो 99.37 टक्के होता.

जायकवाडी 47.79 टक्के !

जायकवाडीत काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत 1715 क्युसेकची पाणी आवक नोंदली आहे. काल या जलाशयातील उपयुक्तसाठा 47.79 टक्के इतका होता. या जलाशयात 36.64 टिएमसी उपयुक्तसाठा झाला होता. तर उपयुक्तसह एकूणसाठा 62. 71 टिएमसी इतका झाला आहे.दरम्यान राहाता व कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण नगण्य आहे. दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या दोन्ही तालुक्यांतील जिथे शक्य असेल तिथे बंधारे, तलाव भरुन द्यायला हवेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या