Tuesday, June 16, 2026
HomeराजकीयRaj Thackeray Meets Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचे मोठे...

Raj Thackeray Meets Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, मला खूप…

मुंबई । Mumbai

शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष आणि त्यांचे भाऊ राज ठाकरे यांनी मातोश्रीवर अचानक भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. या अप्रत्याशित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात सकाळपासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. याचदरम्यान राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आणि बंधू उद्धव यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईही उपस्थित होते. मातोश्रीवर दाखल होताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले.

उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात सुमारे २० ते २५ मिनिटांचा संवाद झाला. या छोट्याशा भेटीनंतर राज ठाकरे मातोश्रीहून निघाले, मात्र त्यांना बाहेर सोडण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः पोर्चपर्यंत आले होते. या भेटीविषयी विचारले असता, “मला खूप आनंद झाला,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी माध्यमांपुढे दिली.

याआधी ५ जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर दिसले होते. मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आयोजित मेळाव्यात त्यांनी हिंदी सक्तीविरोधात एकत्र भूमिका मांडली होती. त्या वेळीही शिवसैनिक आणि मनसैनिकांनी त्यांच्या एकत्र येण्याचे स्वागत केले होते आणि भविष्यात राजकीय स्तरावरही दोघे एकत्र येतील, अशी आशा व्यक्त केली होती. आजच्या या वाढदिवस भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात ‘ठाकरे बंधू पुन्हा एकत्र?’ या प्रश्नावर चर्चा रंगू लागली आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...