नाशिक | Nashik
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha)(दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील एका गोडाऊनमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत ती आघाडी सातव्या फेरीपर्यंत कायम ठेवली आहे. वाजे यांनी तिसऱ्या फेरीत ३० हजार ४८० मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांची ही आघाडी पुढे कायम राहत चौथ्या फेरीत ३६ हजार ३४० इतकी झाली. चौथ्या फेरीत वाजे यांना ०१ लाख १५ हजार ७०९ तर हेमंत गोडसे यांना ७९ हजार ३६९ मते मिळाली. यानंतर पाचव्या फेरीत राजाभाऊ वाजे हे ४८ हजार मतांनी आघाडीवर होते.
त्यानंतर वाजे यांनी ही आघाडी सहाव्या आणि सातव्या फेरीपर्यंत कायम ठेवली आहे. सातव्या फेरी अखेर वाजे हे ६५ हजार मतांनी पुढे आहेत. त्यामुळे अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिल्यास वाजेंचा मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे.