Saturday, November 2, 2024
Homeनगररांजणगावमध्ये आणखी चार जनावरे दगावली

रांजणगावमध्ये आणखी चार जनावरे दगावली

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अज्ञात आजाराने गुरुवारी आणखी चार जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे आता जनावरांचा मृत्यूचा आकडा सात झाला आहे.

- Advertisement -

एका शेतकर्‍याच्या तीन गाई दगावल्या होत्या तर तीन गायी अत्यवस्थ होत्या त्यातील एक गाय गुरुवारी दगावली आहे. रांजणगाव देशमुख येथील कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकर्‍याच्या चार, दशरथ साहेबराव खालकर यांची एक, संपत लक्ष्मण खालकर यांची एक तर अनिल रघुनाथ खालकर यांचा एक बैल अशी सात जनावरे आतापर्यंत दगावली आहेत.

तर अजून चार जनावरे अत्यवस्थ आहेत. आजारी गायी विषबाधा सदृश लक्षणे दाखवत आहेत .ही जनावरे उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. दरम्यान सोमवारी मृत जनावरांचे शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल आला असून त्यात ऑक्झीलेट विषबाधा असल्याची माहिती कोपरगावचे सहाय्यक आयुक्त डॉ.अजयनाथ थोरे यांनी दिली आहे.

बुधवारी नाशिक व नगर येथील पथकाने पाहणी करून चारा,खाद्य व रक्ताचे नमुने घेतले असून ते नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या