Sunday, May 19, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सोयीने करण्यासाठी प्रयत्न करू

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सोयीने करण्यासाठी प्रयत्न करू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सोयीने करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच एमएस सीआयटी वसुली थांबवू अशी ग्वाही राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी दिली.

- Advertisement -

राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या जिल्हा मेळाव्यात वरूटे बोलत होते. यावेळी संघाचे संपर्कप्रमुख विष्णू खांदवे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत व बहुसंख्येने संघ व सदिच्छा प्रेमी उपस्थित होते. शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाची ताकद या मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आली. यावेळी पुन्हा एकदा सदिच्छा मंडळास ताकद देऊन नव्या जोमाने लढण्याचा निर्धार मेळाव्यात सदिच्छा प्रेमींनी व्यक्त केला.

सदिच्छा मंडळ स्वबळावर आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचा निर्धार मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत यांनी बोलून दाखवला. अध्यक्षीय खांदवे यांनी सदिच्छा एक वटवृक्ष आहे. आगामी काळात पुन्हा सत्तेवर सभासद आणतील अशी ग्वाही दिली. याप्रसंगी पारनेर तालुका संघ व सदिच्छा मंडळ कार्यकारिणी जाहीर केली व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले.

प्रसंगी नेवासा तालुक्यातील गुरुकुलचे संतोष पुरोहित व कानिफनाथ दौंड यांनी सदिच्छा मंडळात प्रवेश केला.नगरपालिका संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कबाडी यांना राज्य आदर्श पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

मेळाव्यासाठी रहिमान शेख, मीना जाधव, बाबाजी आव्हाड, शैलेश खणकर, नवनाथ तोडमल, संगीता कदम, प्रतिभा साठे, सतीश चाबुकस्वार, दादा वाघ यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याला गजानन ढवळे, बाळासाहेब खिलारी, अनिल आंधळे, कैलास वर्पे, बबनराव गाडेकर,गाहिनीनाथ शिरसाठ, चंद्रकांत मोरे, संतोष खामकर, उद्धव मरकड, राजाभाऊ बेहेळे, पांडुरंग काळे, विनोद फलके, सुरेश खेडकर, बाळासाहेब मोरे, बप्पा शेळके, समीर शेख, भास्कर कराळे, संतोष दळे, गणेश मोटे, भारत कोठुळे, शकील बागवान, अर्चना भोसले उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या