कोटा –
45 प्रवाशांना घेऊन कमलेश्वर धाम दर्शनासाठी निघालेली बोट राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत उलटली आहे. या बोटीत पुरुषांसह महिला आणि लहान
- Advertisement -
मुलंही होती. दरम्यान, बचाव पथकाने आतापर्यंत 24 जणांना सुरक्षित बाहेर काढलं असून 7 जणांचे मृतदेह सापडले आहेत तर 14 जण बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात खातौली परिसरात बुधवारी (16 सप्टेंबर) सकाळीच गोठडा कला गावाजवळ घडला. अपघातामधील प्रवासी कमलेश्वर धाम दर्शनासाठी जात होते. याचवेळी अचानक नाव उलटली आणि सगळे पाण्यात बुडाले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि मदत-बचाव दला घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बुडालेल्या प्रवाशांच्या शोधासाठी बचाव कार्य सुरु केले.