Monday, October 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTiger Shroff Attack : टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर संशयितांचा दिल्लीमार्गे नेपाळला...; राजस्थान...

Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर संशयितांचा दिल्लीमार्गे नेपाळला…; राजस्थान पोलिसांचा पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली | New Delhi

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Actor Tiger Shroff) कारवर जुहू येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी तीन संशयितांना राजस्थानच्या कोटा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अचूक माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांच्या थरारक ऑपरेशनमध्ये, कोटा रेल्वे स्थानकावर सापळा रचून तिन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. हे संशयित आरोपी दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते, असा मोठा गौप्यस्फोट पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

- Advertisement -

राजस्थान पोलिसांची धडक कारवाई आणि टाईमलाईन

मुंबई पोलिसांनी संशयित आरोपी ‘पुणे-जयपूर एक्सप्रेस’मधून प्रवास करत असल्याची पक्की माहिती राजस्थान पोलिसांना (Rajsthan Police) दिली होती. या माहितीच्या आधारे कोटा रेल्वे पोलिसांच्या संयुक्त पथकाने ट्रेन कोटा स्थानकात येताच अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण ट्रेनची कसून तपासणी केली. हे तिन्ही संशयित ट्रेनच्या जनरल डब्यात प्रवास करत असताना त्यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आजच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या संशयितांचा ताबा मुंबई पोलिसांकडे दिला जाणार आहे.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “हे डरपोक लोक लपून…”; CM फडणवीसांची टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया

संशयितांची ओळख आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी

पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या तिन्ही संशयितांची (Suspected) माहिती उघड करण्यात आली आहे. यात रेहान (वय १८) हा हरियाणाच्या सोनीपतचा (ईदगाह कॉलनी) राहणारा असून, त्याच्यावर यापूर्वी आर्म्स ॲक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या थेट संपर्कात होता. तर ऋतिक कुमार ऊर्फ रोशन (वय २२) हा मूळचा बिहारच्या बेगूसरायचा (पिपराई गाव) रहिवासी असून, सध्या मुंबईतील अंधेरी पश्चिमेत राहत होता आणि रॅपिडो रायडर म्हणून काम करत होता. तसेच अल्पवयीन संशयित आरोपी (वय १७)हा हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील (बरोद ठुठान) राहणारा असून, यातील काही जणांवर यापूर्वी बाईक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हे देखील वाचा : Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातील संशयितांची नावे समोर; एक अल्पवयीन तर दुसरा मुंबईतील…

तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

गोळीबार केल्यानंतर हे तिन्ही संशयित अंधेरीला दुचाकी सोडून लोकल आणि नंतर एक्स्प्रेसने दिल्ली गाठणार होते आणि तिथून नेपाळ बॉर्डर ओलांडून पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता.हे संशयित आरोपी व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि सिग्नल (Signal) सारख्या एन्क्रिप्टेड ॲप्सच्या माध्यमातून आपल्या हँडलर्सच्या सतत संपर्कात होते. गुन्ह्याच्या ठिकाणाची आणि रेकीची माहिती त्यांना याच ॲप्सद्वारे मिळाली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर संशयित आरोपींकडे कोणतेही हत्यार (बंदूक) सापडलेले नाही. हल्ल्यानंतर त्यांनी शस्त्राचे नेमके काय केले? याचा कसून शोध सध्या पोलीस घेत आहेत.

हे देखील वाचा : Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी तीन संशयित ताब्यात; मुंबई अन् कोटा पोलिसांची संयुक्त कारवाई

बिश्नोई गँगचे जाळे उध्वस्त करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सखोल चौकशी

गोळीबारानंतर काही वेळातच बिश्नोई गँगच्या अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि कथित ऑडिओ क्लिप जारी करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तर बिश्नोई गँगच्या अनिल पंडित आणि हरमन संधू यांच्याशी जोडले गेलेले हे जाळे उध्वस्त करण्यासाठी आता मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या संशयित आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे.

ताज्या बातम्या

श्रीरामपूर, संगमनेरच्या सराईत टोळीवर संघटित गुन्हेगारीचे कलम

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) घरात झोपलेल्या महिलेचा गळा दाबून, चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुटणार्‍या श्रीरामपूरच्या मनोज मांजरे याच्या टोळीविरूध्द तोफखाना पोलिसांनी संघटित गुन्हेगारीचे भारतीय...