Sunday, May 19, 2024
Homeनगरदार उघड..उद्धवा, दार उघड...

दार उघड..उद्धवा, दार उघड…

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असताना महाराष्ट्र राज्यातील मंदिरे मात्र अद्यापही बंद आहेत.

- Advertisement -

राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळेच जनता आता राज्यभरातील मंदिरासमोर दार उघड उद्धवा दार उघड असा नारा देत घंटानाद आंदोलन करणार असून या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले.

राजेंद्र गोंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दारूची दुकाने, मॉल, महामार्गावरील ढाबे सुरू करण्यात आली आहेत. मात्र मंदिरे बंद का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

या राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळेच जनता आता राज्यभरातील मंदिरासमोर ‘दार उघड उद्धवा दार उघड’ असा नारा देत घंटानाद आंदोलन करणार आहे. इतर राज्यातील मंदिरे ही भाविकांना दर्शनासाठी खुली केलेली असताना महाराष्ट्र राज्यातील मंदिरे कोव्हिड 19 ची भीती दाखवून अजून का उघडली जात नाही.

यामागील सरकारचे नेमके काय उद्दिष्टे आहेत? राज्यातील अनेक मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाच्या नियमानुसार अटीशर्तीचे पालन करत दर्शनरांगेत बदल करून दर्शनासाठी व्यवस्था तसेच सर्व तयारी पर्ण केली आहे.

काही देवस्थानच्यावतीने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. तरीदेखील अजूनही मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करत आहे. या अन्यायी सरकारच्या विरोधात सर्व जनतेने शनिवारी एकमुखाने घंटानाद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप उत्तर नगर जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या