Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशराजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त; 'या' तारखेला पदभार स्वीकारणार

राजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त; ‘या’ तारखेला पदभार स्वीकारणार

दिल्ली | Delhi

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांची जागा घेतील.

- Advertisement -

राजीव कुमार हे १५ मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. न्याय आणि कायदा मंत्रालयाने गुरुवारी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. (New Chief Election Commissioner of India)

राजीव कुमार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६० रोजी झाला असून ते भारतीय प्रशासनिक सेवेमधले १९८४ च्या तुकडीतले अधिकारी आहेत. राजीव कुमार यांनी ३६ वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली.

आपल्या कार्यकाळामध्ये राजीव कुमार यांनी केंद्राबरोबरच बिहार, झारखंड या गृहराज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये काम केले आहे. बीएससी, एलएलबी, पीजीडीएम आणि एमए पब्लिक पॉलिसीचे शैक्षणिक पदवी असलेले राजीव कुमार यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये कामाचा अनुभव आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या