Wednesday, May 8, 2024
Homeनगरराजूर पोलिसांचा अवैध घरगुती सिलेंडर साठ्यावर छापा; एकास अटक

राजूर पोलिसांचा अवैध घरगुती सिलेंडर साठ्यावर छापा; एकास अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील राजूर गावात 162 घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून अवैध वापर करणार्‍यावर राजूर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली.

- Advertisement -

याप्रकरणी गणेश उर्फ जितेंद्र नंदू लहामगे (रा.राजूर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांना लहामगे याचे घरातील खोली व गोठ्यात ठेवण्यात आलेल्या एकूण 3 लाख 77 हजार 450 रुपये किंमतीचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात 162 घरगुती सिलेंडरचा साठा केलेला आढळून आला. तसेच गॅस सिलेंडर मधून वाहनात गॅस भरणेकरिता लागणारे मशीन व इतर साहित्य मिळुन आले.

याप्रकरणी पोलीस नाईक व्ही. के. मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गणेश उर्फ जितेंद्र नंदू लहामगे याचे विरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस मुद्देमालासह अटक केली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार, सहायक फौजदार प्रकाश निमसे, पो.हे. कॉ. कैलास नेहे, पो. ना. व्ही.के. मुंढे आदींच्या पथकाने हा छापा टाकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या