Monday, October 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar Parth Pawar: आजोबांनाही मागे टाकलं! शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती...

Sharad Pawar Parth Pawar: आजोबांनाही मागे टाकलं! शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती जास्त; आकडा पाहून भुवया उंचावतील

मुंबई | Mumbai
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 7 जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा राज्यसभेवर पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार राज्यसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत.

यावेळी नियमाप्रमाणे या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. या प्रतिज्ञापवार नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे दिसून येते. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

- Advertisement -

शरद पवारांची मालमत्ता
जंगम मालमत्ता ४४ कोटी ७२ लाख रुपये, रोख रक्कम- १ लाख २५ हजार रुपये

बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी
११ कोटी ६६ लाख रुपये
समभाग, म्युचुअल्स फंड आदी- २७ कोटी रुपये
सोने व चांदीचे दागिने वस्तू- ३ कोटी ८५ लाख रुपये
स्थावर मालमत्ता- बारामतीतील शेती, घर, सदनिका आदी मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य- १५ कोटी ९९ लाख रुपये
दायित्व- सुप्रिया एंटरप्रायजेसचे सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपये दायित्व
एकूण मालमत्ता – ६० कोटी ७१ लाख रुपये

Iran-Israel Conflict: “आम्ही त्यांना तात्पुरती तूट कमी करण्यासाठी…”; अमेरिकेच्या अर्थमंत्र्याचे विधान, काँग्रेसची टीका

पार्थ पवार यांची संपत्ती
जंगम मालमत्ता- ११ कोटी ३५ लाख रुपये

बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थामधील मुदत ठेवी
३ कोटी ६८ लाख रुपये
समभाग, म्युच्युअल फंडस आदी
१ कोटी १७ लाख रुपये
सोने चांदीचे दागिने वस्तू
१ कोटी ३१ लाख रुपये
स्थावर मालमत्ता- बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर याचे सध्याचे अंदाजे मूल्य
७६ कोटी ९८ लाख रुपये
बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज
९२ लाख ४८ हजार रुपये
एकूण मालमत्ता- ८८ कोटी ३३ लाख रुपये

Iran-Israel Conflict: इराण-अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका; घरगुती, व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ ऑक्टोबर २०२६ – डिजिटल व्यवहारांचे अर्थकारण आणि विश्वास

0
Daily Deshdoot Editorial 19 October 2026 भारताच्या डिजिटल क्रांतीने आर्थिक व्यवहारांचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत आणि भाजीविक्रेत्यापासून नामांकित व्यापार्‍यापर्यंत सर्वत्र यूपीआय...