Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याप्रेमाचे बंध दृढ करणारे रक्षाबंधन

प्रेमाचे बंध दृढ करणारे रक्षाबंधन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारा आणि त्यांंच्यातील प्रेमाचे बंध अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण ( Rakshabandhan Festival ) साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहे.

- Advertisement -

पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत आकर्षक राख्यांच्या खरेदीसाठी मुली व महिलांनी मोठी गर्दी केली होती. बहिणीला भेट देण्यासाठी गिफ्ट शॉपी, कपडे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांच्या दुकानात ग्राहकांची रेलचेल होती. करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर आलेल्या या सणाला नागरिकांना मोकळेपणाने हा दिवस साजरा करता येत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साह संचारला आहे.

रक्षाबंधनात देवाला प्रार्थना केली जाते. नंतर बहिणी आपल्या भावांचे औक्षण करतात आणि रक्षा मंत्राचा जप करत त्यांच्या मनगटावर राख्या बांधतात. राखी हे सकारात्मकता आणते आणि त्याच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते, अशी श्रध्दा आहे.

श्रावणाची पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:39 ला सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.5 ला समाप्त होईल. म्हणून सण 11 ऑगस्टलाच साजरा केला जाणार आहे. यंदा राख्यांवर आझादी का अमृत महोत्सवाची तिरंगी झलक दिसत आहे.

यंदा बहिणी लाडक्या भावाच्या मनगटावर तिरंगी राखी बांधून आजादी का अमृत महोत्सवासह रक्षाबंधन साजरे होणार आहे. बाजारपेठ विविध आकर्षक राख्यांनी सजली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या