Thursday, May 2, 2024
Homeनगररामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत पालख्या आणू नका

रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत पालख्या आणू नका

साई संस्थानचे साई भक्तांना आवाहन

शिर्डी (प्रतिनिधी) – कोरोना राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाल्यानंतर साईबाबा संस्थानने रामनवमीनिमित्त शिर्डीत पालख्या घेऊन येऊ नये असे आवाहन सार्ईभक्तांना केले असून मंदिर परिसरात गर्दी टाळावी असे आवाहन साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

- Advertisement -

कोरोनोमुळे देशभरात हायअलर्ट करण्यात आले असून शिर्डीतही खबरदारी घेतली जात आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रामनवमी उत्सवावर याचे सावट पसरू लागले आहे. उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थान प्रशासन प्रयत्नाला लागले आहे. या काळात सर्वाधिक गर्दी पायी पालख्यांची असते. दरवर्षी मुंबईतून 97 पायी पालख्या बरोबर लाखो साई भक्त शिर्डीत येत असतात. त्या साई भक्तांना यावर्षी शिर्डीत न येण्याचे आवाहन संस्थानने केले आहे. प्रत्येक पालखी प्रमुखाला संस्थानच्या वतीने पत्र पाठविण्यात आले आहे.

या पालख्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन त्यांना सुचना करव्यात, अशी विनंतरी संस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे, असे कार्यकारी अधिकारी डोंगरे यांनी सांगितले. कोरोनाचे सावट रामनवमी उत्सवावर दिसून येत असून या काळात शिर्डीत लाखोंची गर्दी होत असते. ती गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. मुंबई बरोबर राज्यातील इतर भागातून येणार्‍या पालख्यांनाही संस्थानच्या वतीने येऊ नये असे कळविण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दीही करू नये. प्रत्येक साईभक्ताने याबाबत खबरदारी घ्यावी असे सांगण्यात येत आहे.

गर्दी घटली, दर्शन रांगा ओस
रविवारी होणारी गर्दी घटली असून अत्यल्प गर्दीमुळे दर्शन रांगा ओस पडलेल्या दिसून येत होत्या. यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला कोट्यवधीचा फटका बसत आहे. दिवसाला होणारी दोन कोटींहून अधिकची उलाढाल चाळीस पन्नास लाखांच्या खाली आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, हार, प्रसाद, लॉज यावर मोठा परीणाम दिसून येत आहे. एसटी बस, खाजगी बसेस, रेल्वे व विमान प्रवाशांमध्येही मोठी घट झाली असून साई संस्थानच्या दानातही निम्म्याने घट झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या