Monday, May 6, 2024
Homeनगरराम मंदीर भूमिपूजन; शहरात मोठा बंदोबस्त तैनात

राम मंदीर भूमिपूजन; शहरात मोठा बंदोबस्त तैनात

अहमदनगर ।प्रतिनिधी। Ahmednagar

राम मंदीर भूमिपूजन पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मंदीर भूमिपूजन निमित्ताने काही पक्ष व संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तर कलम 149 नुसार नोटीस दिल्या आहे. या नोटीस नुसार जल्लोष करणार्‍यावर निर्बंध घालण्यात आले आहे. करोना संसर्गाचा धोका होऊ नये, अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलीस सर्तक झाले आहेत.

- Advertisement -

आयोध्या राम मंदीर भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यामुळे नगर शहरातील काही पक्ष व संघटनांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ज्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते, अशा लोकांना कलम 149 नुसार नोटीस बजावून त्यांच्या जल्लोषावर निर्बंध घातले आहे.

करोना संसर्ग धोका होऊ नये साठी शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. शहरातील मंदीर परिसरात फिक्स पाँईट दिले आहे. त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. काही गस्ती पथके स्थापन केली आहे. या पथकाकडून शहरात दिवसभर गस्त सुरू राहणार आहे.

तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, एसआरपीच्या तीन तुकड्या, आरसीपीच्या तीन तुकड्या, 60 होमगार्ड असा 250 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. ड्रोन कॅमेर्‍याद्वारे शहरावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सायबर पोलिसांनी सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या