Friday, May 3, 2024
HomeUncategorizedप्रश्नपत्रिकेच्या बहाण्याने बलात्कार; आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

प्रश्नपत्रिकेच्या बहाण्याने बलात्कार; आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

औरंगाबाद – aurangabad

परीक्षेआधीच इयत्ता दहावीची प्रश्नपत्रिका (question paper) देण्याचे आमिष दाखवून सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नदीम अझिझ शेखला (१९, रा. संजयनगर, खाटीक गल्ली, कोपरगाव) जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी (K. R. Chaudhary) यांनी २० वर्षे सक्तमजुरी व एकूण ४३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

- Advertisement -

या प्रकरणी कन्नड (Kannada) तालुक्यातील पीडितेच्या काकाने फिर्याद दिली होती. त्यानुसार पीडितेची आई वारली असून तिचे वडील वाहनचालक असल्याने बाहेरगावी असतात. म्हणून तिला कोपरगावच्या एका वसतिगृहात ठेवले होते. तेथे आरोपी नदीमने तिच्याशी ओळख वाढवली. तो तिला वसतिगृहात जाऊन त्रास देत होता. त्यामुळे वसतिगृहाच्या रेक्टरने तिला तिच्या घरी पाठवून दिले होते. त्यानंतरही नदीमने मित्राच्या फोनवरून तिच्याशी संपर्क साधत तुला दहावीचे पेपर देतो अशी फूस लावून तिला वैजापूरला बोलावून घेतले. तिला वैजापूर येथील स्वत:च्या भावाच्या घरी व तिथून येवला येथे नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

पीडितेच्या काकाने तक्रार दिल्यावर देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान आरोपी व पीडितेला येवल्यातून ताब्यात घेण्यात आले. पीडितेने १५ फेब्रुवारी २०१६ रोजी दिलेल्या जबाबावरून पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. कोर्ट पैरवी म्हणून व्ही. ए. यमपुरे, एस. एल. सातदिवे व निवृत्ती सुरडकर यांनी काम पाहिले. सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात तक्रारदार, पीडिता, डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.

न्यायालयाने नदीमला भारतीय दंड विधानाच्या ३७६ (२)(आय) कलमान्वये १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, पोक्सो कायद्याच्या ४ कलमान्वये १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, पोक्सोच्या ६ कलमान्वये २० वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सक्तमजुरी, पोक्सोच्या ८ कलमान्वये ३ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन आठवडे अतिरिक्त कारावास, तर पोक्सोच्या १२ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड भरल्यास सात दिवस कारावासाची शिक्षा न्यायालयाने आरोपीला ठोठावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या