Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमनपा आरोग्य केंद्रात रॅपिड अँटीजनच्या नावाखाली प्रत्येकी दहा रुपये उकळल्याचा प्रकार

मनपा आरोग्य केंद्रात रॅपिड अँटीजनच्या नावाखाली प्रत्येकी दहा रुपये उकळल्याचा प्रकार

नवीन नाशिक | प्रतिनिधी

अचानक चौकात असलेल्या महानगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात “अँटीजन रॅपिड” टेस्ट करण्या करिता प्रति रूग्ण दहा रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत तक्रारदार पुढे आले असून वैद्यकीय अधिकारी मात्र या गंभीर प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसुन येत आहेत…

- Advertisement -

शहरात ऑक्सीजनचा तुटवडा, टॉसिलिझुमॅब” आणि “रेमेडेसिव्हीर” चा काळाबाजार उजेडात आला. आणि आता महानगर पालिकेच्याच एका प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क अँटीजन रॅपिड टेस्ट साठी चक्क दहा रुपये घेतले जात असल्याचा प्रकार उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही घरातले एकूण ११ जण अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यासाठी येथील केंद्रात गेलो. आमच्याकडून केसपेपरच्या नावाने ११० रुपये घेण्यात आले. कुठल्याही प्रकारचा केसपेपर देण्यात आला नाही. केवळ एका कोर्‍या कागदावर रिपोर्ट लिहून देण्यात येत होता. तणावात असल्याने आम्ही त्यांना कुठल्या प्रकारची विचारणा केली नाही. त्यावर कारवाई झाली पाहिजे.

नितीन चव्हाण, तक्रारदार

मनपाच्या सदर आरोग्य केंद्रावर आमच्या समोर कुठल्याही प्रकारचा केस पेपर न देता रुग्णांकडून प्रती दहा रुपये घेत असल्याचा प्रकार बघायला मिळाला. त्यासंदर्भात विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सागर चौधरी, अध्यक्ष, शुभोदय फाउंडेशन,

मी नुकतीच कामावर रुजू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात मला काहीही माहिती नाही. चौकशी करून सांगते.

छाया साळुंखे, वैद्यकीय अधिकारी, मनपा, नवीन नाशिक

काही दिवसांकरता माझ्याकडे चार्ज होता. आता तो मी चार्ज सोडलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारून घ्या. मला याची कल्पना नाही.

नवीन बाजी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, नवीन नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या