Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्ररश्मी ठाकरे यांना करोनाचा संसर्ग

रश्मी ठाकरे यांना करोनाचा संसर्ग

मुंबई –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच करोनाचा

- Advertisement -

संसर्ग झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोमवारी रात्री रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्या घरीच क्वारंटाईन झाल्या आहेत.

रश्मी ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या होणार्‍या कॅबिनेटच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या