कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
गोदावरी नदीच्या लहान पुलावरून 32 वर्षीय विवाहित महिलेने नदीच्या पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. तिचा मृतदेह काल शनिवारी राहाता तालुक्यातील रास्तापूर शिवारात गोदा नदीपात्रात आढळून आला. मयत नीता संतोष जपे (वय 32) असे या विवाहित महिलेचे नाव असून ती कोपरगाव तालुक्यातील मोहिनीराज नगर येथील रहिवासी होती. सदर महिलेचा शोध लागला.
राहाता तालुक्यातील रस्तापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेचा नदीकाठी अनेक ठिकाणी शोध सुरू होता. रबरी बोट नदीच्या पाण्यात उतरवतही शोध घेण्यात आला होता मात्र यश येत नव्हते मात्र काल नदीकाठी असणार्या एका ग्रामस्थांना सदर मृतदेह आढळून आला असता त्यांनी कोपरगाव येथील माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड यांना कळविले. त्यांनी नातेवाईकांना सांगितले.
नातेवाईकांनी खात्री केली असता सदर मृतदेह नीता जपे हिचाच असल्याची खात्री पटली. राहाता पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा या मृतदेहाहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.