Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRatan Tata Funeral : 'पद्मविभूषण' रतन टाटा अनंतात विलीन

Ratan Tata Funeral : ‘पद्मविभूषण’ रतन टाटा अनंतात विलीन

वरळी स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

मुंबई | Mumbai

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवारी रात्री निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर आज सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वरळी (Worli) येथील पारशी स्मभानभूमीत (Parsi Memorial) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांना आजारपणामुळे रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर बुधवारी रात्रीच त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी १० ते दुपारी ३.३० या वेळेत लोकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे याकरिता त्यांचे पार्थिव मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये ठेवण्यात आले होते.

हे देखील वाचा : Ratan Tata Death : राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

दरम्यान, यावेळी रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी,आनंद महिंद्रा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी टाटांच्या अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांचीही अलोट गर्दी झाली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या