Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याकाळ्या बाजारात विक्रीच्या प्रयत्नात असलेले रेशनचे धान्य पकडले

काळ्या बाजारात विक्रीच्या प्रयत्नात असलेले रेशनचे धान्य पकडले

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला रेशनच्या तांदुळाची रिक्षा पकडल्याने रेशनचा काळाबाजार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि नवीन नाशिक परिसरातून एक रिक्षा ( एम एच १५ ई एच ३३२६) तांदळाच्या गोण्या घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना समजताच त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते पंकज जाधव,नाना पाटील,सुभाष गायधनी,अविनाश काकडे,दिग्विजय सोनवणे,कुणाल सोनवणे आदींसह सदरहू रिक्षा त्यांच्या सावतानगर येथील कार्यालयात आणून जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणी कारवाईची मागणी केली.

दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना घटनास्थळी पाठवुन सदरहू रिक्षा चालकाची चौकशी करून त्याला अंबड पोलीस ठाण्यात नेवून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

नाशिक शहरात रेशनचा काळाबाजार होत आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा उघड झाले. दरम्यान नाशिक शहरात सीएनजी व एल पी जी गॅॅसचा देखील गैरव्यवहार होत असून यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. शहर शांत ठेवायचे असेल तर जिल्हाधिकारी यांनी गुन्हेगारांना रसद पुरवणारे हे धंदे बंद करावे.

सुधाकर बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या