रोजगारनिमित्त हैद्राबाद गेलेले १२ मजूर बुधवारी रावेरात परतले असून त्यांची रावेर ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता,ते सर्व निगेटिव्ह आले आहे.त्यांची घरोघरी रवानगी करण्यात आली आहे.
तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे केळीकामासाठी गेलेल्या रावेर तालुक्यातील केऱ्हाळे,भोकरी,रसलपूर येथील १२ मजूर बुधवारी रावेरात आले,
त्यांची रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.एन.डी.महाजन यांनी तपासणी केली असता त्यांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्याने,सर्वाना घरी पाठवण्यात आले आहे.त्यांना १० दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील दिला आहे.