Tuesday, July 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजरोहित-विराटनंतर आता 'या' अष्टपैलू खेळाडूचाही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'रामराम'

रोहित-विराटनंतर आता ‘या’ अष्टपैलू खेळाडूचाही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘रामराम’

मुबंई | Mumbai

- Advertisement -

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

त्यानंतर आता या यादीत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचेही (Ravindra Jadeja) नाव जोडले गेले असून त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो वनडे आणि कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर तीन महान भारतीय क्रिकेटपटूंनी या फॉरमॅटला अलविदा केला आहे.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच ‘टीम इंडिया’ मालामाल, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी रक्कम

जडेजाने इन्स्टाग्रामवर (Instagram) टी-२० विश्वचषक २०२४ च्या ट्रॉफीसह फोटो पोस्ट करत ही मोठी घोषणा केली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “माझ्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद! मी टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरला अलविदा म्हणत आहे.अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे मी माझ्या देशासाठी नेहमीच १०० टक्के दिले आहेत आणि देत राहीन. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक जिंकणे हे एक स्वप्न जे आता सत्यात उतरले आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या आठवणी आणि अतुलनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद” असे त्याने म्हटले आहे.

हे देखील वाचा : ICC T-20 World Cup-2024 : IND Vs SA : भारतीय संघ विश्वविजेता

रवींद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी २० कारकीर्द

रवींद्र जडेजा पहिल्यांदा टी-२० विश्वचषक २००९ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहिला. या अष्टपैलू खेळाडूने ७४ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.ज्यामध्ये एक फलंदाज म्हणून त्याने २१.४६ च्या सरासरीने आणि १२७.१६ च्या स्ट्राईक रेटने ५१५ धावा केल्या आहेत. त्याचवेळी, रवींद्र जडेजाने भारतासाठी गोलंदाज म्हणून टी-२० सामन्यांमध्ये ७.६२ इकॉनॉमी आणि २९.८५ च्या सरासरीने ५४ बळी घेतले. तर टी-२० क्रिकेटमध्ये ४६ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या