Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशRBI चा झटका! रेपो रेटमध्ये वाढ, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

RBI चा झटका! रेपो रेटमध्ये वाढ, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

मुंबई | Mumbai

देशात महागाईने (Inflation) कहर केला आहे. या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेत सर्वसामान्यांना धक्का दिला आहे.

- Advertisement -

RBI ने तब्बल दोन वर्षांनी रेपो दरात (Repo Rate) वाढ केली आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी बुधवारी दुपारी अचानक पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात ०.४० टक्के वाढ करणार असल्याची माहिती दिली.

राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, २ मे आणि ४ मे रोजी झालेल्या RBI च्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि त्यात ४० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बऱ्याच काळापासून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यापूर्वी रेपो रेट ४ टक्के होता, तो आता ४.४० टक्के होईल, असे दास म्हणाले.

काय होणार परिणाम?

रेपो रेट वाढवल्याने कर्ज महागणार आहेत. याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. कर्जावरील व्याज दर वाढणार असल्याने EMI मध्येदेखील वाढ होणार आहे.

‘प्रार्थना’चं निखळ सौंदर्य हिरव्या पैठणीत खुललं, पाहा PHOTO

रेपो रेट म्हणजे नेमकं काय?

रेपो रेटच्या आधारावर आरबीआय बँकांना कर्ज देत असते. त्यानंतर बँका हे कर्ज ग्राहकांना देत असतात. रेपो रेट कमी असल्याचा अर्थ असा आहे की बँकांकडून लोकांना मिळणारे कर्ज स्वस्तात मिळू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या