Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशRBI Repo Rate: गृह, वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आरबीआयची रेपो दरात...

RBI Repo Rate: गृह, वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आरबीआयची रेपो दरात कपात, कर्जचा हफ्ता आणखी कमी होणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
स्वतःचे घर, चारचाकी घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर कमी करण्याच्या बाजूने सदस्यांनी मतदान केले आहे. 0.25 टक्क्यांनी रेपो दरात कपात झाली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदरातही मोठी कपात होणार आहे. महागाई दर सातत्याने कमी आणि आर्थिक विकास दरात चांगली वृद्धी होत असल्याने आरबीआयने व्याजदर घटवल्याचे सांगितले जातेय.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी नवे पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.25 टक्क्यांच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

- Advertisement -

वर्षभरात आरबीआयने १२५ बेसिस पॉइंट्सची कपात
रिझर्व्ह बँकेने वर्षभरात रेपो रेटमध्ये १२५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात १०० बेसिस पॉइंट्सने कपात झाली होती. त्यानंतर आता दोनवेळा रेपो रेट स्थिर होता. आता पुन्हा यामध्ये कपात केली आहे. रेपो रेटमुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होणार आहे. चलनविषयक धोरण समितीने ही कपात जवळजवळ पाच वर्षांनी केली होती. दुसऱ्यांदा, एप्रिलच्या बैठकीत व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला. तिसऱ्यांदा, जूनमध्ये रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. त्यानंतर आता रेपो रेटमध्ये आणखी 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

YouTube video player

रेपो रेट म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्याने आता बँकाना आणखी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध होईल. याचा फायदा बँका आपल्या ग्राहकांनाही देऊ शकतील. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सरकारी आणि खासगी बँकांकडून गृहकर्जाचे व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केले जाऊ शकतात. तसे घडल्यास हा सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : कांदा बाजारभावात घसरण; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0
येवला | प्रतिनिधी | Yeola कांदा बाजारभावात (Onion Rate) घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज, बुधवारी, (दि. ४) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास 'जय जवान...