Wednesday, May 8, 2024
Homeजळगावरावेर तालुक्यातील पाच ग्रा.पंचायतींचे फेर आरक्षण कार्यक्रम जाहीर

रावेर तालुक्यातील पाच ग्रा.पंचायतींचे फेर आरक्षण कार्यक्रम जाहीर

रावेर – प्रतिनिधी Raver

तालुक्यातील १० ग्रामपंचायतीत संबंधित प्रवर्गातील सदस्य निवडले नसतांना आरक्षण निघाल्याने पेच निर्माण झाला होता,यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी फेर आरक्षणाचे आदेश काढले आहे.

- Advertisement -

शनिवारी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी बजावलेल्या या आदेशात विवरे खुर्द, भोर, सुदगांव,मस्कावदसीम,रेंभोटा ग्रामपंचायतीत काढलेल्या आरक्षणाचे सदस्य निवडून आलेले नसल्याने ९ फेब्रुवारी रोजी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली फेर आरक्षण प्रक्रिया केली जाणार आहे,यासाठी संबंधित तहसीलदार यांना आदेश देण्यात आले आहे.

तसेच मोरगांव खुर्द, निंभोरा बुद्रुक, कोचुर बुद्रुक, रमजीपूर, अजनाड या ठिकाणी निघालेल्या आरक्षणात अनुसूचित जाती-जमाती स्त्री जागी अनुसूचित जाती, जमातीच्या पुरुषांकरिता बदल करण्यात आला आहे.त्यामुळे या ठिकाणी नव्याने आरक्षण काढण्याचा मुद्दा निकाली काढण्यात आला आहे.सरपंच पदाच्या आरक्षणाने निर्माण झालेला गुंता सोडवण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या