Friday, May 3, 2024
Homeजळगाववाचन हे पावसाप्रमाणे झिरपणारे असावे : प्रा. व. पु. होले

वाचन हे पावसाप्रमाणे झिरपणारे असावे : प्रा. व. पु. होले

जळगाव jalgaon

वाचन (Reading) हे उत्तराच्या पावसाप्रमाणे (rain) झिरपणारे आणि रुजणारे असले पाहिजे. त्यासाठी वाचन,चिंतन,मनन आणि रुजवन असे टप्पे असावेत, काय वाचावे?,काय वाचू नये? याची समज असली पाहिजे, ग्रंथात आणि त्याच्या वाचनात खुप मोठी ताकद आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते प्रा. व. पु. होले (Prof. V. P. Hole) यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

नूतन मराठा महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठा भाषा संवर्धन पंधरवड्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

प्रा. व. पु. होले आणि प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

परिचय मराठी विभागाचे प्रा. राकेश गोरासे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रयोजन व त्यामागील उद्देश आणि भूमिका आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी मांडली.

वाचन संस्कृती वर बोलताना प्रा. व. पु. होले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अब्दूल कलाम, हिटलर आणि आण्णा हजारे यांच्या जीवनात वाचनाने झालेल्या अमुलाग्र बदलांचे उदाहरणे दिली.

वाचन संस्कृतीचा पुर्वेतिहास सांगताना त्यांनी, धर्मगुरू पासून च्या मौखिक गुरुशिष्य परंपरांचा उल्लेख केला. देशाचा खरा विकास फक्त शिक्षकच करु शकतो म्हणून माझी जयंती शिक्षक दिवस म्हणून साजरी करावी हा डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विचार आणि मोबाईल मुळे वाया जाणारा वेळ यावर गंमतीशीर टोलेबाजी करत त्यांनी व्हाट्सप वर येणारे काॅपीपेस्ट मेसेज आणि मौतीत दिला जाणारा दुखवटा दोघंही निरुपयोगीच असतात अशा विनोदात्मक शैलीतून चौफेर फटकेबाजी करत मनोरंजनातून ज्ञानरंजनाकडे नेत आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा समारोप केला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ. एल. पी. देशमुख यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशी व्याख्यानं झाली पाहिजेत,खरं तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा किंवा अशा कुठल्याही कार्यक्रमासाठी शासनाला सुचना किंवा नियम करायला संधीच मिळू नये तर ती प्रत्येक महाविद्यालय, शाळा आणि कार्यालये यांच्या माध्यमातून आपापल्या लेव्हलवर झाली पाहिजेत.

हा पंधरवडाच नव्हे तर जवळपास वर्षभर भाषा संवर्धनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून आमचं महाविद्यालय काम करत राहणार आहे आणि याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी समारोप झालेली सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती म्हणजे ३ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारी व्याख्यानमाला होय अस़ं सांगत अध्यक्षीय समारोप केला

सुत्रसंचलन मराठी विभागाच्या डॉ सुषमा तायडे यांनी तर आभारप्रदर्शन मराठी विभागाचे प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख, मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर, मराठी विभागाचे सर्व प्राध्यापक सर्व शाखेचे विभाग प्रमुख आणि सर्व शाखेचे प्राध्यापक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या