Saturday, November 23, 2024
Homeक्राईमNashik Crime News : हार्ट केअरमधील स्वागतिकेने केला 'इतक्या' लाखांचा अपहार

Nashik Crime News : हार्ट केअरमधील स्वागतिकेने केला ‘इतक्या’ लाखांचा अपहार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्टच्या हार्ट केअरमध्ये स्वागतिकेचे काम करणाऱ्या तरुणीने (Young Woman) कागदोपत्री झोल करुन तब्बल तीन लाख रुपयांचा अपहार (embezzlement) केला आहे. याबाबत कार्डिओलॉजिस्टने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने रिसेप्शनिस्ट तरुणीवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, कॅनडा कॉर्नर (Canada Corner) येथील रामदास कॉलनीत कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर (रा. सायकल सर्कल, समर्थनगर, नाशिक) यांचे इंम्पल्स अॅडव्हान्स हार्ट केअर सेंटर आहे. त्यात स्वागतिका म्हणून, योगिता खाडे (रा. विरोबावाडी, सिन्नर) ही सन २०२२ पासून कार्यरत होती.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना चार वर्षांचा कारावास

सदर तरुणीने जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत तिने डॉ. शेतकर यांचा विश्वास संपादन करुन विविध हार्ट पेशंट, त्यांच्या नातलगांकडून तपासणी (Examination) सल्ला तसेच रिपोर्टची फी आकारण्याचे काम केले. ते करत असतानाच रोख स्वरुपात पैसे आकारुन रेकॉर्डवरील पावत्यांमध्ये पेशंटच्या नावापुढे स्वत:च्या हस्ताक्षरात विविध रकमा ऑनलाईन पद्धतीनेच जमा झाल्याचे लिहून बोगसगिरी केली.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सहा कोटी रुपये उकळले

दरम्यान, त्या माध्यमातून तिने तब्बल तीन लाख चार हजार रुपये परस्पर अपहार करुन हे पैसे कुठेतरी वापरले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे (Sarkarwada Police Station) उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या