Friday, May 3, 2024
Homeनाशिकओबीसी आरक्षणास मान्यता; शिवसैनिकांकडून आतषबाजी

ओबीसी आरक्षणास मान्यता; शिवसैनिकांकडून आतषबाजी

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणावर (Political reservations) शिक्कामोर्तब केल्यामुळे शिवसेनेतर्फे (shiv sena) आज (दि. 21) फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत पेढे वाटून

- Advertisement -

आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आघाडी सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे ओबीसी समाजाला (OBC Community) न्याय मिळाल्याचे शिवसेना (shiv sena) संपर्कप्रमुख जयंत दिंडे (Contact Head Jayant Dinde) व जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

राजकीय आरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक होता. कोर्टाने आरक्षण लागू केल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेतर्फे महालक्ष्मी मंदिर परिसरात फटाक्यांची (Fireworks) आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी मिळाले रे मिळाले आरक्षण मिळाले, आघाडी सरकारमुळे आरक्षण मिळाले, उद्धव साहेबांमुळे ओबीसींना आरक्षण मिळाले अशा घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, माजी आ. राजेंद्र देशमुख, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक, संजय कटारिया, कैलास गवळी, प्रमोद पाचोरकर, अ‍ॅड. सुधाकर मोरे, सनी फसाटे, शैलेश सोनवणे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (Local Self-Government) निवडणुकीत (election) इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी बांठिया आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने दिलेल्या अहवालातील तरतुदी सर्वोच्च न्यायालाने स्वीकारून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण लागू केले. दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. ओबीसी समाजासाठी हा मोठा दिलासा असून आगामी निवडणुकीत शिवसेनेला याचा नक्कीच फायदा होईल, असे शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे व जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या