Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपोस्टात अडीच हजार पदांसाठी भरती

पोस्टात अडीच हजार पदांसाठी भरती

नाशिक | Nashik

बेरोजगार तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी असून, भारतीय टपाल विभागात २ हजार ४२८ विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे.

- Advertisement -

या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र सर्कलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. शहरासह ग्रामीण भागात भारतीय टपाल विभागाचे जाळे पसरले आहे. देशातील दीड लाखापेक्षा जास्त टपाल कार्यालयांमार्फत विभागाचा कारभार चालतो.

महाराष्ट्र सर्कलसाठी होणाऱ्या या भरतीत ब्रँच पोस्टमास्तर, असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर, डाकसेवक आदी पदांचा समावेश आहे. या तिन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आवश्यक असून, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्रही बंधनकारक राहणार आहे.

यासह सायकलिंगदेखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सायकल चालवित असल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे. खुला प्रवर्गच्या १,१०५, एसटीच्या २४४, एससीच्या १९१, ओबीसीच्या ५६५, ईडब्ल्यूएसच्या २४६ तर दिव्यांगांच्या ७७ जागांसाठी भरती होणार आहे. २० ते २८ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच तर इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी तीन वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्लूएस प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, महिलांसाठी कोणतेही शुल्क नसणार आहे.

इच्छुक उमेदवारांना संकेतस्थळावर २६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करू शकेल.

नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करू शकतो. दरम्यान, ब्रँच पोस्टमास्तर पदासाठी १२ हजार वेतन दिले जाणार आहे. असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तरपदासाठी आणि डाक सेवकपदासाठी १० हजार (४तासांच्या सेवेसाठी) वेतन मिळणार आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, दहावी मार्कशीट / बोर्ड प्रमाणपत्र, फोटो, सही, जातीचा दाखला, एमएस-सीईटी प्रमाणपत्र, ई-मेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या