शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी सोमवारी शिर्डी येथे येऊन साईबाबांच्या समाधीचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात दर्शन (Sai Darshan) घेतले. यावेळी त्यांनी साईबाबा संस्थानला 5 कोटी रुपयांची भरघोस देणगी (Donation) अर्पण केली.
अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी सायंकाळच्या सुमारास शिर्डीत (Shirdi) आगमन केले. त्यांनी साईबाबांच्या मंदिरात (Sai Baba Temple) होणार्या धूपआरती सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली. बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (CEO Goraksh Gadilkar) यांनी अनंत अंबानी यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले. या छोटेखानी सत्कार सोहळ्याला संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
शिर्डी भेटीचे औचित्य साधून अनंत अंबानी यांनी सामाजिक बांधिलकी जपत 5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट संस्थानकडे सुपूर्द केला. ही मोठी देणगी (Donation) साईबाबांच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी मोलाची ठरणार आहे. अंबानी कुटुंबीयांची शिर्डीच्या साईबाबांवर मोठी श्रद्धा आहे. यापूर्वीही अंबानी परिवाराकडून संस्थानला विविध स्वरूपात मदत करण्यात आली आहे. आजच्या या भेटीमुळे आणि दातृत्वामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




