Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : अंशकालीन निदेशकांच्या रखडलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा!

Ahilyanagar : अंशकालीन निदेशकांच्या रखडलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा!

23 कोटी 48 लाख रूपये वितरीत करण्यास मान्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काल 9 फेब्रुवारी 2026 रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे अंशकालीन निदेशकांच्या रखडलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रांत असणार्‍या शाळांमध्ये 5 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींनुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार शाळांमध्ये कार्यरत असणार्‍या अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी आवश्यक असणारी रक्कम रु. 23,48,92,000/-इतका निधी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर निधी अंशकालीन निदेशकांच्या जून 2025 पासूनच्या मानधनाकरिता शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संबंधित जिल्हा परिषद / महानगरपालिका/ नगरपालिका / नगरपरिषदनिहाय वितरित करावा व वितरित केलेल्या निधीचा तपशिल शासनास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अंशकालीन निदेशकांच्या सुधारीत धोरणानुसार अंशकालीन निदेशकांना अदा करावयाच्या कमाल मर्यादेतील दहा महिन्यांच्या मानधनाकरिता रु. 85.80 कोटी इतका निधी सन 2025 च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे.
शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी पत्रान्वये उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये 2824 अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच, महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत 705 अंशकालीन निदेशक असे एकूण 3529 अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अंशकालीन निदेशकांच्या जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत 2824 अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी रु.42,85,26,000/- इतका निधी तसेच, महानगरपालिका / नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत 705 अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी रु. 10,63,66,000/- इतका निधी आवश्यक आहे. त्यानुसार, एकूण 3529 अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी एकूण रु. 53,48,92,000/- इतका निधी आवश्यक आहे. याकरिता पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या रु. 85,80,00,000/- इतक्या निधीतून रु. 30,00,00,000/- इतका निधी.20 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आला आहे.

तथापि, महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांतील शाळांमध्ये कार्यरत अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध नसल्याने जून 2025 पासून मानधन अदा करता आले नाही. यासंदर्भात श्रीमती गायत्री मुळे व इतर यांनी उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेल्या रिट याचिका क्र. 12629/2025 मध्ये दि. 23.01.2026 रोजी मानधन अदा करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांमधील शाळांमध्ये कार्यरत असणार्‍या अंशकालीन निदेशकांना मानधन अदा करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून निधी आहरित करून सर्व कार्यरत अंशकालीन निदेशकांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला होता.

उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले व याचिका दाखल न केलेल्या सर्वच अंशकालीन निदेशकांच्या मानधनाकरिता आवश्यक असणार्‍या रु. 53,48,92,000/- इतका निधी आवश्यक आहे. यास्तव सर्वच अंशकालीन निदेशकांच्या मानधनाकरिता आवश्यक असणार्‍या रु. 53,48,92,000/-इतक्या निधीतून रु.30,00,00,000/- इतका निधी यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे. आता, अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार रु. 23,48,92,000/- इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे...

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori आज दिनांक ३ एप्रिल २०२६ रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात कार क्रमांक MH15-JS-1053 विहिरीत कोसळली. या अपघातात कार मधील ९...