नाशिक । प्रतिनिधी Nashik
पालकांना दिलेल्या आश्वासनानुसार संस्थेने कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान न करता सर्व सोयींनी सुसज्य अशी इमारतीचे नूतनीकरणाचे काम केले असून सोमवार (दि.३जुलै ) पासुन सीएचएमई सोसायटी शिशु विहार बालक मंदिर इंग्रजी माध्यम शाळा १ली ते ४थी सदरहू इमारतीमध्ये सुरु होणार असल्याची माहिती संस्था सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्था, नाशिक विभाग कार्यवाह मिलिंद वैद्य,संस्था,सहकार्यवाह नाशिक विभाग आनंद देशपांडे,कोषाध्यक्ष नाशिक विभाग राहुल वैद्य,इ.५वी ते १०,इंग्रजी माध्यम समिती अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी,मुख्याध्यापक राजन चे्टीयार उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना हेमंत देशपांडे यांनी सांगितले कि,संस्थेच्या अंतर्गत सुरु असलेल्या सर्व शाळा एकाच वेळात व मराठी व इंग्रजी माध्यम एकाच ठिकाणी भरविण्याकरिता इंग्रजी माध्यमाच्या १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांची ईमारत चालू शैक्षणिक बदलण्यात आली होती.
सदरहू इमारत जुनी असल्याने याठिकाणी डागडुजीचे काम करण्याची गरज होती ते काम आम्ही शाळा सुरु असतांना करणार होतो मात्र विद्यार्थ्यांना सोबत घेत पालकांनी या ठिकाणी (दि.१५जून) आंदोलन केले होते. यावर संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांची इंग्रजी व मराठी माध्यमांची शाळा एकाच ठिकाणी दोन सत्रात घेत सदरहू जुन्या इमारतीची डागडुजीचे काम पूर्ण केले.
यामध्ये २३ वर्ग,सायन्स लॅब,म्युझिक रूम,चित्रकला रूम आदींचा समावेश असून यासोबतच काही वर्गांमध्ये स्मार्ट बोर्ड देखील बसविण्यात आले आहेत. याठिकाणी व परिसरात सुरक्षेच्या सर्व उपाय योजना पूर्ण करण्यात आल्या असून २३ सीसीटीव्ही देखील बसविण्यात आले आहेत यामुळे विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा कुठलाही प्रश्न शिल्लक राहिला नसून पालकांच्या प्रतिनिधींनी देखील सदरहू कामांची पाहणी केली असून त्यांनी देखील समाधान व्यक्त केले. यावेळी देशपांडे यांनी संस्थेकडून आगामी काळात केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देखील दिली.