मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस (Rain) कोसळत होता. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर आज (सोमवारी) गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने (Rain) उघडीप घेतली आहे. मात्र, काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमरास मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) म्हारे शिवारातील गिरणा नदी (Girna River) पात्राच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेले १५ जण अडकल्याची घटना घडली होती.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाची दमदार हजेरी; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?
गिरणा व मोसम नदीला अचानक आलेल्या पुरामुळे (Flood) नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. त्यामुळे हे १५ जण तब्बल २० तासांहून अधिक वेळ नदीपात्रातून अडकले होते. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ (SDRF) जवानांकडून तरुणांना (Youth) बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यात त्यांना यश येत नव्हते.
हे देखील वाचा : गिरणा नदीला पूर
दरम्यान, यानंतर अखेर आज प्रशासनाने वायुदलाच्या हेलिकॉप्टरची (Air Force Helicopters) मदत घेऊन या १५ जणांची तब्बल वीस तासानंतर सुखरूप सुटका केली. त्यामुळे या १५ जणांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच यावेळी अग्निशमन दल, पट्टीचे पोहणारे व एसडीआरएफच्या पथकाची देखील मदत घेण्यात आली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा