Friday, May 17, 2024
Homeनाशिककेटीएचएम महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन; भारत सरकारचे पेटंट प्राप्त

केटीएचएम महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन; भारत सरकारचे पेटंट प्राप्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मविप्र संस्था संचलित के टी एच.एम.महाविद्यालयातील प्रा. डॉ. विक्रम काकुळते (Dr. Vikram Kakulte), मायक्रोबायोलॉजी विभागातील (Department of Microbiology) कार्यरत प्रा.वैशाली अर्जुन टिळे व प्रा.अमृता उत्तमराव जाधव यांच्या पेस्टिसाईट डिटेक्टींग प्लेटला (Pesticide detecting plate) भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

मायक्रोबायोलॉजी विषयातील हे पहिले पेटंट मिळविण्याचा मान या प्राध्यापकांना मिळाला आहे.या पेंटटमुळे वन विभाग, फळबाग उद्योजक,इंटरनॅशनल इम्पोर्ट- एक्सपोर्ट विभाग, कोल्ड स्टोरेज उद्योजक व सर्वात महत्वाचा शेतकरी वर्ग यांना अतिशय फायदा होणार आहे. सध्या फळे, पालेभाज्या या सर्वावर औषधांची फवारणी केली जाते. काही पेस्टिसाईट मानव जीवनासाठी अतिशय घातक असू शकतात. इंटरनॅशनल इम्पोर्ट- एक्सपोर्टसाठी पदार्थावर पेस्टिसाईटची विशेष चाचणी केली जाते. घातक पेस्टिसाईट आढळल्यास संपूर्ण शेतमाल आयात निर्यातीसाठी नाकारले जाते व शेतकर्‍यांचे अपरिमित नुकसान होते.

यासाठी या प्राध्यापकांनी संशोधन केलेली पेस्टिसाईट डिटेक्टींग प्लेट ही अतिशय उपयोगी पडू शकते. या प्लेटवर विविध घातक ऑर्गनोक्लोरीन पोटॅशियम आयोडाइड सारखे रसायने ओळखू शकतात. तसेच त्यांचे प्रमाण किती आहे हे देखील त्यांच्या रंगाच्या बदलावरून कळून येते असे प्राध्यापकांनी सांगितले आहे.

महाविदयालयातील प्रा.डॉ.विक्रम काकुळते, प्रा. वैशाली टिळे, अमृता जाधव यांच्या पेटंटमुळे महाविद्यालयातील संशोधन कार्यात व मानांकनात भर पडली आहे, असे गौरवोद्गगार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड यांनी काढले.

यावेळी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या हस्ते प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते ,चिटणीस डॉ. सुनील ढिकले,उपसभापती राघोनाना अहिरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एस जे कोकाटे व संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या