Sunday, November 24, 2024
Homeनाशिकसंतप्त रहिवाशांचा येवला पोलिस ठाण्यावर मोर्चा

संतप्त रहिवाशांचा येवला पोलिस ठाण्यावर मोर्चा

येवला । प्रतिनिधी

भरधाव वाहनाच्या धडकेत विठ्ठल नगरातील पाच वर्षीय रूद्र पागिरे (Rudra Pagire) या मुलाचा बळी गेला. या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त रहिवाशांनी शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. (Yeola Latest News)

- Advertisement -

मयत रुद्रचे पालकांसह विठ्ठल नगर परिसरातील रहिवाशांनी गुरुवारी, (दि. ३०) सायंकाळी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. शहर पोलीस ठाणे आवारात मोर्चा दाखल झाला असता काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोर्चेकरी काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. (Latest Marathi News)

हे ही वाचा : भाजपचे आंदोलन सुरु असतानाच आव्हाडांसाठी भुजबळ सरसावले; म्हणाले, “केवळ विरोधक म्हणून…”

पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) असून या फुटेज मधील मुख्य आरोपी कोण याचा शोध घ्या, तसेच त्याला कठोर शिक्षा करा, हिट अँड रन कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले. तर जो पर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली.

सदर घटनेच्या तपासकामी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. राजकीय दबावाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असताना देखील पोलीस वेळकाढू पणा करत असल्याचा संशय मृत रुद्र याची आई राधिका, वडील समाधान पागिरे यांनी व्यक्त केला आहे. तर, या प्रकरणी न्याय न मिळाल्यास कुटुंबासह पोलीस ठाणे आवारात आत्महत्या करू, असा इशारा मयत रूद्रच्या आई – वडिलांनी यावेळी दिला. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून आरोपींना कठोर शासन करावे असे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटले.

हे ही वाचा : नाशकात पुन्हा सापडल्या बनावट नोटा; दोन महिला ताब्यात

दरम्यान, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी, सदर घटनेतील आरोपीला ताब्यात घेतलेले आहे, तसेच घटनेतील सागर दिलीप परदेशी यांच्या मालकीचे (निळ्या रंगाचे ट्रॅक्टर) वाहन जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यानंतर मोर्चेकऱ्यानी पोलीस ठाणे सोडले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या