Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमसेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरी

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील नांदुर निंबादैत्य येथील भिमराव दहिफळे (वय 74) या सेवानिवृत्त शिक्षकांच्या घरी चोरी (Retired Teacher Theft) झाल्याची घटना घडली आहे. दहिफळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरटे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. दहिफळे व त्यांच्या पत्नी हे (दि.25) ऑक्टोबरला घराचा दरवाजाला आतुन कुलुप लावुन बंद करून झोपले व कुलपाच्या चाव्या टेबलावर तेथेच ठेवल्या.

- Advertisement -

26 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दहिफळे यांच्या पत्नीला आवाज आल्याने जाग येऊन, मोठ्याने आरडल्या. तेव्हा भीमराज दहिफळे हे झोपेतुन जागा झाले व तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की, मला आपल्या घरात आवाज आल्याने मी उठले.आपल्या घरातुन एक इसम बाहेर पळाला म्हणून मी ओरडले. दहिफळे दाम्पत्यांनी पाहिले असता, घराचा आतुन दरवाजाचे कुलुप टेबलावर ठेवलेल्या चावीने उघडलेले दिसले. घरातुन वरती काढलेला जिन्याचा टेरिसवरील दरवाजा पाहिला असता त्याचा आतील कोंडा तुटलेला होता.

तेथे घराला लावलेली एक लोखंडी सिडी दिसली. घरातील ड्रावरमध्ये ठेवलेले पैसे व दोन सोन्यांच्या अंगठ्या दिसुन आल्या नाही. एक अनोळखीइसमाने टेरिसवरील जिन्याचा दरवाजाचा कोंडा तोडुन ड्रावरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या व पैसे चोरुन नेले आहे. चोरीस (Theft) गेलेल्या सोन्यांचे दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या व 500 हजार रुपये सुरू केल्याची नोंद पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या