Friday, November 15, 2024
Homeनगरमहसूल कर्मचार्‍यांचे उद्यापासून काम बंद

महसूल कर्मचार्‍यांचे उद्यापासून काम बंद

प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महसूल कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आता सोमवार (दि.15) कर्मचार्‍यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून राज्य शासन पातळीवर असणार्‍या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी संघटनेने वेळोवेळी शासनाला निवेदने देऊन महसूल विभागातील रिक्तपदे भरावेत, लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा, पदोन्नती, पदाचे नामांतरण, वैद्यकीय बिले आदी मागण्यांकडे लक्ष वेधले होते. या मागण्यांची पूर्तता न झाल्याने दोन दिवसांपूर्वीच आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. यात काळ्या फिती लावून बुधवारी (दि.10) आंदोलन करण्यात आले. दुसर्‍या दिवशी निर्देशने करण्यात आली. शुक्रवारी (दि. 12) लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. आता सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

- Advertisement -

शासनाने मागील बैठकांचे इतिवृत्त वाचन व आढावा घ्यावा, महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समीतीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा, अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पद्दोन्नती देणेबाबत शासन स्तरावर अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. अद्यापपर्यंत पदोन्नती आदेश पारीत झालेले नाहीत. राज्यातील सर्व विभागांचे अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पद्दोन्नती आदेश तदर्थ पदोन्नतीसह निर्गमित करावेत, सुधारीत नविन आकृतीबंधानुसार पुरवठा विभागातील लिपीक-टंकलेखक व अव्वल कारकून/पुरवठा निरीक्षक यांची पदे सरळसेवा भरती करण्यात येत असून सदर पदांचा सरळसेवा परीक्षेचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे सदरील कर्मचारी हे जुलै-2024 पर्यंत येणार आहेत. महसूल विभागातील अव्वल कारकून कर्मचारी हे पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना मूळ महसूल विभागात सामावून घेण्यासाठी राज्यातील बर्‍याचशा जिल्ह्यात जागा या रिक्त नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे महसुल विभागाचा आकृतीबंद तत्काळ मंजूर करावा. संजय गांधी योजना विभाग, रोजगार हमी योजना विभाग, निवडणूक विभाग व इतर तत्सम विभागाचे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, वैद्यकिय देयके 2 ते 3 वर्षांपासून प्रलंबित आहेत. महसूल सहायक व तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असूनही महसूल सहायक यांचा ग्रेडपे 1 हजार 900 तर तलाठी यांचा ग्रेडपे 2 हजार 400आहे. त्यामुळे महसुल सहायक यांचा ग्रेडपे 2 हजार 400 करण्यात यावा. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समक्ष असलेल्या महसूल विभागातीलच नियुक्त लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीचे अधिकारी प्रदान करावेत. नायब तहसीलदार संवर्ग हा राजपत्रीस संवर्ग असून सुध्दा त्याची वेतनश्रेणी वर्ग तीन संवर्गाची देण्यात आलेली आहे. ती बदल करून 4 हजार 800 करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आंधळे, उपाध्यक्ष कैलास सांळुके, सरचिटणीस अक्षय फलके यांनी केलीआहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या