Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक कुंभमेळ्यासाठी रिंगरोडला मान्यता

नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंगरोडला मान्यता

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Nashik

YouTube video player

सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे ६६ किलोमीटर लांबीचा अंतर्गत रिंग रोड उभारण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय २४.३५ किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईसह नाशिक, पुण्यातील महत्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोडसह अंतर्गत रिंग रोड उभारणे आवश्यक आहे. या रिंग रोडमुळे नाशिक कुंभमेळ्यासाठी सात मार्गाने येणाऱ्या भाविकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

या रिंग रस्त्यांची कामे मार्च-जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर या रस्त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक भूसंपादनासही मान्यता देण्यात आली असून यासाठी लागणारा खर्च नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक वाहतूक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

0
सिन्नर | प्रतिनिधी सिन्नर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज...